Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भक्तवडी डोंगर परिसरात हरिणाचे पाडस सापडले
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: re4
5सातारारोड, दि. 9 : भक्तवडी-कल्याणगड परिसरातील डोंगरावर पवनचक्की कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या युवकांना रविवार, दि.7 रोजी रात्री 2 च्या सुमारास हरिणाचे तीन ते चार वर्षांचे पाडस सापडले. ते त्यांनी भक्तवडी, ता.कोरेगाव हद्दीतील वाठार स्टेशन ते कोरेगाव मार्गावर रात्रगस्त घालत असलेल्या सातारारोड पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले.
रात्रगस्तीत सहभागी असलेले सातारारोड पोलीस दूरक्षेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी हरिणाचे हे पाडस ताब्यात घेऊन काही गैरप्रकार नसल्याबाबत खात्री केली व तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर कोरेगाव वनविभागातील वनरक्षक राम शेळके यांचा फोन नंबर प्राप्त केला व त्यांच्याकडे हे पाडस रीतसर कार्यवाही  करून सुपूर्द केले. सदरचे पाडस हे भुकेले असल्याने त्यास पुढील संगोपन व औषधोपचाराची वनविभागाने जबाबदारी घेतली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: