Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
ऐक्य समूह
Wednesday, October 10, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर कार्यकर्त्यांना वेध लागलेले असतात ते नवरात्र उत्सवाचे. यंदाच्या वर्षी एक महिना उशिराने नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. सातारा शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची देवीच्या स्वागतासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. शहर व तालुक्यात नवरात्र मंडळांनी आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई केली आहे.
नवरात्र उत्सवाचे निमित्ताने विविध देवीच्या मंदिरातून भजन व श्‍लोकाच्या कार्यक्रमामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. यामध्ये जखिणवाडीतील मळाईदेवी, पंताच्या कोटामधील भवानी माता, उत्तरालक्ष्मी, रेणुकादेवी, जानाईदेवी आदी देवींच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची मोठी तयारी करण्यात आली आहे. घरोघरी नवरात्रोत्सवाच्या सोहळ्यास आजपासून प्रारंभ होत आहे. या नवरात्र उत्सवाचे निमित्ताने बाजारपेठेत फळे, फुले व अन्य गोडधोड पदार्थांना विशेष मागणी आहे. नवरात्र उत्सवाचे निमित्ताने एक विचार मंथनाचे दृष्टिकोनातून शारदीय व्याख्यान-मालांचा सर्वत्र प्रारंभ होत आहे.
नवरात्रातील नऊ दिवसांमध्ये नवरंगाची उधळण होत असते. या उत्सवाचे रंग खुलवण्यात महिलाही नवनवीन शक्कल लढवत असतात. या नऊ दिवसात उपवास करून देवीचा जागर केला जातो. नवरात्रोत्सवातील नऊ रंगाना महत्त्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने महिला नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ रंगांच्या साड्या किंवा ड्रेसही वापरतात.    
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित होते. ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळेल, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सर्व दुकानदारांकडून घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीचे देशपातळीवर स्वागत होत आहे. केंद्रीय पर्यावरण सचिवांनीही महाराष्ट्रात येऊन याबाबत माहिती घेतली आहे. न्यायालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा संपविण्यासाठी दहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता यापुढे अधिक संधी देण्यात येणार नाही. पुढच्या आठवड्यात उच्चस्तरीय समितीची बैठक होणार असून प्लास्टिकबंदीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात येणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: