Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी सौ. प्रतिभा धुमाळ यांची निवड
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 10 : फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदी हिंगणगाव गणातून निवडून आलेल्या सौ. प्रतिभा अरविंद धुमाळ यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी  संतोष जाधव यांनी केली. या घोषणेनंतर सभागृहातील सदस्यांनी सौ. धुमाळ यांचे अभिनंदन केले तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
सभापती सौ. रेश्मा भोसले यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापतिपदाच्या जागेसाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी झालेल्या विशेष सभेत सौ. प्रतिभा धुमाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध  निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी जाहीर केले. सौ.धुमाळ यांना प्रशासनाच्यावतीने शुभेच्छा देवून सत्कार केला. यावेळी मावळत्या सभापती सौ. रेश्मा भोसले, उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समितीचे सदस्य   श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक-निंबाळकर  यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर, माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, वसंतकाका गायकवाड, दत्तात्रय गुंजवटे, शंकरराव माडकर, उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. लतिका अनपट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुभाषराव  धुमाळ, बाळासाहेब मोहोळकर- कासार, विश्‍वा सराव धुमाळ, अरविंद धुमाळ, ज्ञानेश्‍वर भोईटे यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी सौ. धुमाळ यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: