Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:53 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 10 : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी शहर व तालुक्यात साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी 8.30 पासून आपल्या सरोज व्हिला या निवासस्थानी श्रीमंत संजीवराजे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील,  विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत दादाराजे खर्डेकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व शासकीय अधिकार्‍यांनी श्रीमंत संजीवराजे यांचे अभीष्टचिंतन केले.
शहर व तालुक्यातील विविध संस्था, संघटनांचे प्रमुख, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तथापि, योग्य नियोजन करून येणार्‍या प्रत्येकाला रांगेतून शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचता येईल यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याने दुपारी 1.30 ते 2  पर्यंत लोकांनी रांगा लावून शुभेच्छा दिल्या.
फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन व बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, संचालक विनायक बेलदार-पाटील, मोहनराव निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष रसाळ, प्रभारी प्राचार्य रत्नपारखी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फडतरे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य अर्जुन रूपनवर, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य हंकारे यांच्यासह फलटण एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापक, शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,(पान 1 वरून)
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्चे कार्यकारी संचालक राजीव मित्रा, राष्ट्रवादी काँंग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. लतिका अनपट, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, सर्व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्मा भोसले व त्यांचे सहकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, व्हाईस चेअरमन महादेवराव चव्हाण व त्यांचे सहकारी संचालक, व्यवस्थापक तुकाराम नलवडे, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन भोसले व सहकारी संचालक, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंगटे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता निकम, सहाय्यक अभियंता योगेश सावंत,  सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता महेश नामदे, असिस्टंट रजिस्ट्रार सहकारी संस्था धायगुडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष गायकवाड व त्यांचे सहकारी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विक्रम पोटे व त्यांचे सहकारी, फलटण शहरातील डॉक्टर्स विशेषत: डॉ. जे. टी. पोळ, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सस्ते, डॉ. गांधी, डॉ. पाचवडकर, डॉ. सागर गांधी, डॉ. राजवैद्य, डॉ. राऊत, डॉ.रणवरे, डॉ. रसाळ, डॉ. सौ. बर्वे, अ‍ॅड. अजित शिंदे, अ‍ॅड. बाबूराव गावडे, अ‍ॅड. रमेश भोसले, अ‍ॅड. दीपक रुद्रभटे, अ‍ॅड. रोहित अहिवळे, अ‍ॅड. संदीप लोंढे, बिल्डर्स असोसिएशनचे प्रमोद निंबाळकर, महेंद्र जाधव, उमेश नाईक-निंबाळकर, रणधीर भोईटे, सुनील जंगम, योगेश पाटील, अनिल निंबाळकर, गुणवरेच्या सरपंच सौ. प्रवीणा गावडे, उपसरपंच तुकाराम गावडे व सहकारी सदस्य, ईश्‍वरकृपा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या.
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. रविवार पेठ तालीम मंडळाच्यावतीने विविध रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. साखरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले.  त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्या व सहकारी संस्थांमध्येही वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तरडगाव येथे श्रीमंत संजीवराजे मित्र मंडळाच्यावतीने श्रीमंत संजीवराजे यांचा आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाच्यावतीने तरडगाव येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके भेटीदाखल देण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: