Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सार्वजनिक बांधकाम विभागात दुसर्‍यांदा झाली चोरी; लॅपटॉप, चाव्या लांबवल्या
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा चोरी झाली आहे. 20 दिवसात दोन वेळा चोरीची घटना घडली आहे.  बांधकाम विभागातून शनिवार  ते सोमवार दरम्यान 12 चाव्या व एक लॅपटॉप चोरीला गेला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बांधकाम विभागातील लिपिक हेमंत जनार्दन टांकसाळे (वय 45, रा.फलटण) यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बांधकाम विभाग शनिवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता बंद झाला. रविवारी सुट्टीनंतर सोमवारी  कार्यालय उघडण्यात आले. त्यावेळी कार्यालयातील किल्ल्यांचा गुच्छ नसल्याचे महिला कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. याबाबतची चर्चा कार्यालयात सुरू झाल्यानंतर कार्यालयातून एका लॅपटॉपचीही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. गेली तीन दिवस कार्यालयातील सर्व वस्तूंचा आढावा घेण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर बांधकाम विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर  अखेर गुरुवारी  तक्रार दाखल करण्यात आली. वीस दिवसापूर्वी बांधकाम विभागातून ठरावीक कागदपत्रे, फायलीची चोरी झाली होती. त्यानंतर पुन्हा लॅपटॉप व किल्ल्या चोरीला गेल्या आहेत. 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: