Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूजमध्ये शाळकरी मुलीची आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re1
5वडूज, दि. 11 : येथील विद्यानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या नेत्रा उमेश सरतापे (वय 14) या शाळकरी मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेत्राची आई पिंकी उमेश सरतापे या नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. 10) सायंकाळी एका खाजगी दवाखान्यात नोकरीवर गेल्या होत्या. 
घरात नेत्रा व तिचा लहान भाऊ उदय हे होते. गुरुवारी सकाळी 8.15 च्या सुमारास नेत्राने घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद अर्चना अशोक बनसोडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वडूज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नेत्राचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस नाईक राहुल सरतापे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: