Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भिलार येथे महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: re3
5पाचगणी, दि. 4 : भिलार येथे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या प्रारंभीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की आज दुपारच्या सुमारास पाणी भरण्यासाठी शेतालगत असलेल्या विहिरीवर गेलेल्या जयश्री दशरथ जाधव (वय 42), रा. भिलार यांचा पाय घसरल्यामुळे त्या विहिरीत पडल्या व त्यातच त्यांचा अंत झाला. घटनेची माहिती कळताच महाबळेश्‍वर ट्रेकरचे जवान या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी विहिरीत उतरून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. सनी बावळेकर, विशाल बेलोशे, अनिल केळगने, सुनील भाटिया व त्यांच्या सहकार्‍यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार नंदकुमार कुलकर्णी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: