Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाठार किरोलीतून हार्डवेअरचे साहित्य गायब
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: re1
5रहिमतपूर, दि. 4 : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथून 49 हजार 500 रुपये किमतीचे हार्डवेअर मटेरियल चोरट्याने गायब केल्याची फिर्याद कॉन्ट्रॅक्टर महनतेश चनमलप्पा वाली (रा. शिरोळेनगर, पिंपळ गुरव, पुणे) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, संबंधिताने वाठार (किरोली) गावच्या हद्दीत उरमोडी पंप हाऊस टप्पा क्रमांक एकच्या  पाइलाइनसाठी हायटेन्साईल नटबोल्ट (31 नग) अंदाजे किंमत 25 हजार रुपये, फौंडेशन बोल्ट (580 किलो) अंदाजे किंमत 22 हजार रुपये, एमएम लोखंडी बार (22 नग) अंदाजे किंमत 1 हजार 500 रुपये, सोळा एमएम लोखंडी बार (33 नग) अंदाजे किंमत 1 हजार असे एकूण रुपये 49 हजार 500 रुपयांचे हार्डवेअर मटेरियल चोरट्याने गायब केले आहे. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार आर. पी. कांबळे तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: