Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानसाठी हेरगिरी; बीएसएफ जवान अटकेत
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: mn2
5फिरोजपूर, दि. 4 (वृत्तसंस्था) : भारत-पाकिस्तान सीमेलगत असणारे रस्ते आणि इतर माहिती पाकिस्तान गुप्तहेराला देण्याच्या संशयावरुन बीएसएफच्या जवानाला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जवानावर बीएसएफची गुप्तचर शाखा पाळत ठेवून होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान महाराष्ट्रातील रेनपुरा गावातील  रहिवासी आहे. बीएसएफच्या 29 व्या बटालियनमध्ये पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये कर्तव्यावर होता. त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला सीमेलगतच्या रस्त्यांचे फोटो, बीएसएफ अधिकार्‍यांचे फोन क्रमांक आणि अन्य गुप्त माहिती त्याने आपल्या फोनद्वारे दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या जवानावर गोपनीय माहिती कायदा आणि इतर कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जवानाला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करणार असल्याचे तपास अधिकारी रंजित सिंह यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: