Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पैशाची मागणी करून शिवीगाळ, मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: lo4
तक्रारीत माजी आमदाराचे नाव
5सातारा, दि. 5 : जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला असतानाही घरात घुसून, पुन्हा पैशाची मागणी करून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधातील गुन्हा मागे घे, असे सांगत मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करणार्‍याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्याचे जितेंद्र जगन्नाथ जाधव (रा.कल्याणी शाळेजवळ, गोडोली) असे नाव आहे.   
या प्रकरणी खुशबू अतुल शहा (वय 27, रा. प्रिया डुप्लेक्स, नवी एमआयडीसी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 4 रोजी सकाळी दहाच्या सुमारास संशयित जितेंद्र जाधव हा तक्रारदार यांच्या घरात गेला. संशयित व तक्रारदार यांचा जमिनीचा व्यवहार झालेला आहे. त्या व्यवहारात काही देणे-घेणे नसतानाही तक्रारदार याने जमिनीच्या व्यवहारातील सुमारे 50 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी संशयिताने शिवीगाळ करून कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केली.
मारहाण करताना संशयिताने शहा कुटुंबीयांना माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी केली तसेच पैसे न दिल्यास कुटुंबातील व्यक्ती उचलून नेण्याची धमकी दिली. संशयिताने घरात घुसून हा सर्व प्रकार केल्याने तक्रारदार यांचे शहा कुटुंबीय भीतीच्या छायेखाली होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: