Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खराडेवाडी येथे कारची झाडाला धडक, महिला ठार, दोघे जखमी
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
5लोणंद, दि. 5 :  खराडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत झायलो कार झाडाला धडकून, शेतात पलटी होऊन झालेल्या अपघातात श्रीमती स्मिता उद्धव घनवट (वय 42),  रा उपळवे, ता. फलटण या ठार झाल्या तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
कमिन्स कंपनीचे टूरिस्ट झायलो कार ( क्र. एम. एच. 14 बीए 4943) चालक समर्थ जगन्नाथ पिसाळ (वय 24), रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण हा चालवत होता. कमिन्स कंपनीतील चार महिला कर्मचारी सोडण्यासाठी तो गेला होता. त्या महिलांना सोडून येताना चालकाच्या पाठीमागील सीटवर स्मिता घनवट तर चालकाशेजारी गोरख दत्तोबा हिवरकर हे बसले होते.  
समर्थ पिसाळ हा वेगात गाडी चालवत होता. लोणंद ते फलटण मार्गाने तो गाडी कमिन्स कंपनीकडे नेत असताना सह्याद्री ढाब्याच्या पुढे अचानक कार डाव्या बाजूला वळली. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रेक मारला परंतु तोपर्यंत गाडी झाडावर आदळली व रस्त्याच्या खाली चार फूट उसाच्या शेतात पलटी झाली. हा अपघात रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला.
या अपघातात स्मिता घनवट या ठार झाल्या तर चालक समर्थ पिसाळ व गोरख हिवरकर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची खबर गोरख दत्तोबा हिवरकर यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस कर्मचारी शिवाजी तोडरमल तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: