Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपहरण करून एकाला मारहाण
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : कल्याणी शाळा परिसरातून अल्पवयीन युवकाचे दुचाकीवरुन अपहरण करुन त्याला विसावा नाका येथे नेवून मारहाण केल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्याची अनिकेत जाधव, संग्राम जाधव, यश जगताप, संग्राम चव्हाण, सिध्दार्थ जगताप, अनिरुध्द पवार (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी नावे आहेत. रणवीर राजेश पवार (वय 16, रा. सदरबझार) या युवकाने तक्रार दिली आहे. दि. 23 ऑक्टोबर सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली आहे. चप्पल पास करण्याच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार युवकाचे दुचाकीवरुन अपहरण केले. संशयितांनी केलेल्या मारहाणीत रणवीर पवार याच्या डोळ्याला लागले आहेे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: