Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदीचा काळ्या पैशावर काडीमात्र परिणाम झाला नाही : रावत
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : मुख्य निवडणूक आयुक्तपदावरुन पायउतार होणार्‍या ओ. पी. रावत यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्याची टीका केली आहे. नोटाबंदीचा काळा पैशावर काहीही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांमधील (मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम) विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही जप्त केलेली रक्कम जवळपास 200 कोटी होती, अशी माहिती रावत यांनी दिली. यावरुन निवडणुकीदरम्यान येणारा पैसा हा प्रभावी लोकांकडून येत असून अशा प्रकारच्या निर्णयांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
रावत यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याला धक्का पोहोचणार आहे. नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा  चलनातून बाद केल्या. त्यामुळे काळा पैसा उघड होईल तसेच भ्रष्टाचाराचे कंबरडं मोडेल, असा दावा केला होता. मात्र रावत यांच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर काहीच फरक पडला नाही.
शनिवारी रावत मुख्य निवडणूक आयुक्तपदावरुन पायउतार झाले. 11 डिसेंबरला पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: