Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डहाणू परिसरात भूकंपाचे धक्के सुरूच
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) : डहाणू तालुक्यातील धुंदलवडी परिसरात रविवारी मध्यरात्री 1.35, 1.45 आणि 2.05 वाजता असे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता तलासरी ते चारोटीपर्यंत जाणवली.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाडा, दापचरी, शिसने, आंबोली, चिंचले, नागझरी, वांकास वसा, करांजविरा, तलोटे, पुंजवा तसेच तलासरी तालुक्यातील काही गावांनी घराबाहेर राहून रात्र घालवली. या भूकंपाचे धक्के झाई तसेच चरोटीपर्यंत जाणवले. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.15 वाजता 3.3 रिश्टर स्केलचे मोठे धक्के बसले होते. तसेच 24 ऑक्टोबर रोजी पहिला मोठा धक्का बसला होता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतींचे नुकसान झाले होते. या भागात सातत्याने होणार्‍या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी गाव सोडून नातेवाईक व इतरत्र स्थलांतर केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: