Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऑफलाइन ‘आधार’चा सरकार-आरबीआयचा विचार
ऐक्य समूह
Tuesday, December 04, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेशासाठी आधार सक्ती करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक खडबडून जागी झाली आहे. आधार सक्तीऐवजी क्यूआर कोडच्या आधारे ऑफलाइन ‘आधार’ वापरण्याच्या पर्यायाचा विचार सध्या केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेकडून केला जात आहे.
ऑफलाइन आधारचा वापर करण्याबाबत सरकार आणि आरबीआय यांच्यात चर्चा सुरू आहे. हा पर्याय निश्‍चित झाल्यास बँक खाते उघडणे, पेमेंट वॉलेट आणि विमा मिळवण्यासाठी बायोमेट्रिक ई-केवायसीऐवजी ऑफलाइन ‘आधार’चा वापर करण्यात येईल. 
आधार सक्तीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ऑफलाइन आधारची चर्चा सुरू झाली. ऑफलाइन आधारची यूएआयडीएआरच्या सर्व्हरशी कोणतीही लिंक राहणार नाही. ऑफलाइन आधार रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्राइतकेच महत्त्वाचे राहील. पासपोर्ट आणि बँक खाते उघडण्यासाठी याचा फायदा होईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: