Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात एटीएम फोडले
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: lo1
20 लाखांची रोकड लंपास
5सातारा, दि. 4 : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील बारावकरनगर (कोडोली) शाखेचे एटीएम फोडून चोरट्यांनी 19 लाख 83 हजार 500 रुपयांची कॅश लंपास केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी संभाजीनगर येथील अहिरे कॉलनीतील एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सागर सुरेश घाडगे (वय 30), रा. शाहूपुरी हे एटीएम सेवा पुरवितात. बारावकरनगर येथील स्टेट बँक शाखेत अजित घाडगे, अविनाश शेलार यांनी पैसे भरले होते. दि. 4 रोजी बारावकरनगर येथील एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता चोरट्यांनी एटीएमची काच फोडून कटरच्या सहायाने मशीन फोडून रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. सागर घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 लाख 83 हजार 500 रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत.      
सातार्‍यात एटीएम फोडले
चोरट्यांनी आतील सर्व कॅमेरे फोडून नंतरच चोरी केली. दरम्यान, अहिरे कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या दोन्ही घटनांमुळे  एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: