Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किरकोळ कारणावरून एकावर चाकू हल्ला
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: re3
5देशमुखनगर, दि. 5 : पाडळी, ता. सातारा येथे दुचाकी दिली नाही म्हणून चिडून केलेल्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाडळी येथे रात्री घडली. यामध्ये तानाजी तात्याबा ढाणे (वय 45, रा. पाडळी, ता. सातारा) हे जखमी झाले असून संशयित विक्रम जोताराम ढाणे (रा.पाडळी, ता. सातारा) याला बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला जिल्हा न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी तानाजी ढाणे हे त्यांच्या मोटरसायकलवरून गावातील ग्राम-पंचायत पटांगणात आले असता संशयित विक्रम ढाणे याने त्यांना दुचाकी मागितली. 
त्यांनी दुचाकी देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सोडवा-सोडवी केल्यावर तानाजी ढाणे घरी आले.  काही वेळातच संशयित विक्रम हा त्यांच्या घरी आला व पुन्हा भांडू लागला. यावेळी विक्रम ढाणे याने त्याच्याजवळील चाकूने तानाजी ढाणे यांच्या गळ्यावर, चेहर्‍यावर व हातावर चाकूने वार केले. घरातील इतर सदस्यांनी भांडणे सोडवून गंभीर जखमी असलेल्या तानाजी ढाणे यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले. रात्री उशिरा जखमी तानाजी ढाणे यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयित विक्रम ढाणे याला बोरगाव पोलिसांनी अटक केली. बुधवारी संशयितास जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास हवालदार भीमराव यादव करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: