Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महेश सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 40 लाखांंचा अपहार
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo1
सहकार क्षेत्रात खळबळ; 12 जणांवर गुन्हे दाखल
5सातारा, दि. 6 : सन 2010 ते 2016 या दरम्यान महेश नागरी पतसंस्थेमध्ये अ‍ॅड. मुकुंद सारडा यांच्यासह 13 जणांनी संगनमत करून 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार राणी शिवाजी घायताडे (वय 41), रा. कोरेगाव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात  दिल्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार या ऑडिटर असल्याने पोलीस पुढे काय कार्यवाही करतात याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
तक्रार दाखल झालेल्यांमध्ये मुकुंद सारडा (वय 60), रा. भवानी पेठ,  सुभाष लोया (वय 60), रा. लोखंडे कॉलनी, शिरीष पालकर (वय 53), रा. भवानी पेठ, राहुल गुगळे (वय 51), रा. प्रतापगंज पेठ, रवींद्र जाजू, (वय 61), रा. शनिवार पेठ, सुरेश सारडा (वय 55), रा. भवानी पेठ, नीलेश लाहोटी (वय 45), प्रतापगंज पेठ, धीरज कासट (वय 33), रा. भवानी पेठ, सुरेश भस्मे (वय 65), रा. सोमवार पेठ, राजश्री लाहोटी (वय 55), रा. भवानी पेठ, सुनील राठी (वय 62), रा. सोमवार पेठ, पद्मा कासट (वय 25), रा. भवानी पेठ, हेमंत कुलकर्णी, रा. सोमवार पेठ या 13 जणांवर 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार करुन ती रक्कम  भरण्यास टाळाटाळ करुन सभासद, ठेवीदार आणि शासनाची फसवणूक केल्याचे राणी घायताडे यांनी शाहूपुरी पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: