Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

ऑस्ट्रेलियाचा 146 धावांनी विजय
ऐक्य समूह
Wednesday, December 19, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: sp1
5पर्थ, दि. 18 (वृत्तसंस्था) : भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला 5 गड्यांची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 5 बळी टिपले आणि सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने 3-3 गडी बाद केले. सामन्यात 8 बळी टिपणार्‍या लॉयनला सामनावीर घोषित करण्यात आले.
चौथ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 112 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र दुसर्‍या डावात भारताची सुरुवात खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला तर भरवशाचा फलंदाज पुजारा 4 धावा करून बाद झाला. कोहली (17), विजय (20) आणि रहाणे (30) यांनी काही काळ संघर्ष केला, पण तिघेही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर आज दिवसाच्या खेळात आधी विहारी (28), त्या पाठोपाठ पंत (30), उमेश यादव (2), इशांत शर्मा (0) आणि बुमराह (0) तासाभराच्या कालावधीत बाद झाले.
तत्पूर्वी, नॅथन लॉयनने घेतलेल्या 5 बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला.
विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (20), कोहली (123) आणि शमी (0) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील 36 धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: