Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डब्ल्यू. व्ही. रामन
ऐक्य समूह
Friday, December 21, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: sp1
5मुंबई, दि. 20 (वृत्तसंस्था) : भारताचे माजी सलामीवीर वुरकेरी व्यंकट रामन यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
महिला विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर संघातील खेळाडूंमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले होते. माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज मिताली राजला त्या सामन्यात न खेळवल्याबद्दल प्रशिक्षक रमेश पोवार आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यार टीका झाली होती. त्यामुळे पोवार यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन, व्यंकटेश प्रसाद आणि रामन यांची नावे अंतिम निर्णयासाठी प्रशासकीय समितीकडे पाठवली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, प्रशिक्षकपदासाठी रामन यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. 53 वर्षीय रामन सध्या बंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजीचे प्रशिक्षण देत आहेत. भारताकडून ते 11 कसोटी आणि 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बीसीसीआयच्या अधिकार्‍यानी दिलेल्या माहितीनुसार, कर्स्टन यांच्या नावालाच समितीची पसंती होती. मात्र, ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रशिक्षकपद सोडण्यास तयार नसल्याने अखेर रामन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: