Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडाची पारंबी डोक्यात पडून शाळकरी मुलगा ठार
ऐक्य समूह
Saturday, January 05, 2019 AT 11:49 AM (IST)
Tags: re3
5कुडाळ, दि. 4 : फलटण येथील कमला निंबकर बालभवन या शाळेची सहल जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे आली असता वडाच्या पारंब्यांशी खेळताना प्रज्वल नितीन गायकवाड (वय 11, रा. अलगुडेवाडी) या इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात झाडाची पारंबी पडली. या दुर्घटनेत तो जागीच ठार झाला.
जावली तालुक्यातील प्रसिद्ध वडाचे म्हसवे या गावामध्ये मुलांना वडाची झाडे दाखवण्यासाठी फलटण येथील कमला निंबकर बालभवन या शाळेची सहल आली होती. त्या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारंबीला लोंबकळत असताना प्रज्वल गायकवाड या मुलाच्या डोक्यात वडाची पारंबी तुटून पडल्याने तो जागीच ठार झाला. त्याला कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ आणण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: