Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: mn7
5मुंबई, दि. 6 : अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले खा. नारायण राणे यांचा भाजपच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकींचा जाहीरनामा तयार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वीस सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून एकमेव नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. राजनाथ सिंह या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील.
भाजप पुरस्कृत खासदार असलेले नारायण राणे यांनी गेल्या काही दिवसात सतत भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवण्याची घोषणा केली होती. शिवसेनेला युतीत घेतल्यास आम्ही एनडीएचा पाठिंबा काढून घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते. सध्या युतीचे काय होणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी भाजपने मात्र आपल्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे यांना स्थान दिल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून जाहीरनामा समितीसोबतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील समिती तयार करण्यात आली आहे. आठ सदस्यांची ही समिती असून त्यामध्ये अरुण जेटली, पीयूष गोयल, राज्यवर्धन राठोड या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.       
तर इतर सामाजिक संघटनांना आपल्याकडे वळवण्यासाठी सामाजिक संस्था संपर्क समिती तयार करण्यात आली असून नितीन गडकरी यांच्यासमवेत 13 सदस्य या समितीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: