Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवशाहीला आग; जीवितहानी टळली
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re1
5पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बसच्या अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हं नाहीत. कासारवाडीजवळ एका शिवशाही बसला अचानक आग लागली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी आठच्या सुमारास शिवाजीनगर बस बसस्थानकातून शिवाजीनगर ते श्रीरामपूर शिवशाही बस (क्र. एम.एच. 14 जीयू 2310) सुटणार होती. परंतु, त्या पूर्वीच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे गाडीने अचानक पेट घेतला. चालक पप्पू आव्हाड यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी एबीसी पावडर असलेला सिलिंडर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्याच्या बाहेर गेली होती.  महामार्गावरून प्रवास करणार्‍या एका सजग नागरिकाने अग्निशमन दलाला फोन करत पाचारण केले. त्यांनी तत्काळ येऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. 
शिवशाही बसला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे अशोक कानडे यांच्या टीमने आगीवर नियंत्रण आणले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: