Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अफगाणिस्तानमध्ये सोन्याची खाण खचून 30 जण ठार
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: na3
5काबूल, दि. 6 (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानातील कोहिस्तान जिल्ह्यात रविवारी सोन्याची एक खाण खचून 30 जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले.
बडाखशान प्रांतातील कोहिस्तान जिल्ह्यात ही सोन्याची खाण आहे. प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्ता मोहम्मद नजारी यांनी माहिती दिली, की सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. कामगार काम करत असताना हा अपघात घडल्याने मृतांची संख्या वाढली. जे जखमी आहेत त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
अनेक खाणी अवैध पद्धतीने सुरू असतात. खाणमालक नियमबाह्य पद्धतीने सोने आणि कोळशाच्या खाणींमध्ये काम करतात आणि निर्दोष कामगारांचे जीव जातात. बचावकार्यासाठी खाणीचं मॅपिंग आवश्यक असते, पण खाणच अवैध असल्याने मालकांकडे कोणतेही मॅपिंग नसते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: