Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कामगार, शेतकरी संघटनांची आज व उद्या बंदची हाक
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार व शेतकरी संघटनांनी उद्या, दि. 8 व बुधवार, दि. 9 रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या संपात बँक कर्मचार्‍यांच्या दोन संघटनाही सहभागी होत आहेत. या बंदमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सर्व सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. डाव्यांचा प्रभाव असलेल्या केरळ व पश्‍चिम बंगालमध्ये या संपाचा विशेष प्रभाव पडेल, असे बोलले जात आहे. मुंबईतही बेस्ट कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून संप पुकारला आहे.
केंद्रातील मोदी सरकारला शेती क्षेत्र आणि शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटांची चिंता नाही, त्याचबरोबर सरकारची धोरणे कामगारविरोधी आहेत, असा आरोप करत शेतकरी व कामगार संघटनांनी मंगळवारी व बुधवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.  
यामध्ये केंद्रीय व राज्य कामगार संघटनांबरोबर ऑल इंडिया किसान सभा, भूमी अधिकार आंदोलन समिती व शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको, धरणे आदी आंदोलने करण्यात येणार आहेत. मात्र, सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेल्या भारतीय मजदूर संघाने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: