Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लिंब येथील व्यापारी सागर खादगे अपघातात जागीच ठार
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 8 : लिंब येथील प्रसिध्द व्यापारी सागर विष्णूपंत खादगे, वय 32, रा. लिंब हे  रामनगर परिसरातील आंधळ्या वळणावर अपघातात जागीच ठार झाले. 
सातारा शहराजवळील रामनगर येथील आंधळ्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायं. 5 वा. लिंब येथील प्रसिद्ध व्यापारी सागर विष्णूपंत खादगे, वय 32, रा. लिंब. (ता. सातारा) यांचे जागेवर अपघाती निधन झाले. रामनगर परिसरातील आंधळ्या वळणावर पाठी मागून आलेल्या अज्ञाताने सागर यांच्या ज्युपिटर या दुचाकी गाडीला जोराची धडक मारल्याने अपघात घडला. धडक इतकी जोराची होती की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर येथील नागरिकांनी गौरीशंकरची रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालय, सातारा येथे तातडीने त्यांना हलवले.  
येथे आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना 3 बहिणी ,आई, असा परिवार आहे. आपल्या दुचाकीवरून साताराकडे येत असताना रामनगर जवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने सागर खादगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने लिंब गावावर शोककळा पसरली आहे.  जिल्हा शासकीय रुग्णालयात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: