Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय रॉक बॉल स्पर्धेत अंगद भोसलेला सुवर्णपदक
ऐक्य समूह
Thursday, January 24, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: sp2
5कोरेगाव, दि. 23 : श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रॉक बॉल स्पर्धेत 16 वर्षांखालील भारतीय संघाने विजेतेपद पटकावलेे. येथील चॅलेंज अ‍ॅकॅडमीचा विद्यार्थी अंगद अजित भोसले याच्या नेतृत्वाखाली संघाने यश मिळवून सुवर्णपदकाने संघाचा गौरव केला आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रासाठी नवा असलेला रॉक बॉल हा खेळ प्रकार अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. चॅलेंज अ‍ॅकॅडमीचे संस्थापक दिलीप वेलियावेट्टील, प्राचार्या ऋता जोशी, प्रशिक्षक सचिन साळुंखे यांनी या खेळ प्रकारामध्ये सर्वच मुलांना चांगले प्रशिक्षण दिले होते. राज्य पातळीवरील सामने पुण्यात झाल्यानंतर पानिपत येथे झालेल्या राष्ट्रीय सामान्यातून अंगद भोसले याची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याच्या खेळाची पद्धत पाहून, त्याच्यावर संघ प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने नेत्रदीपक खेळ करत विजेतेपद खेचून आणत सुवर्णपदक पटकावले आहे.
एकसळ, ता.कोरेगाव येथील स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक, प्रगतशील शेतकरी व ऑल इंडिया कुस्ती चँपियन पै. बलभीम भोसले यांचा नातू तर कृषिभूषण पुरस्कारप्राप्त पै. अजित भोसले यांचा अंगद हा मुलगा आहे. यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: