Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रॅक्टर पलटी होवून दहिवडीचा युवक ठार
ऐक्य समूह
Thursday, February 07, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5दहिवडी, दि. 5 : येथील भाटकी मळ्यातून दहिवडीकडे येत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात संकेत मोहन जाधव (वय 18), रा. रानमळा, दहिवडी हा युवक जागीच ठार झाला. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास भाटकी मळ्याकडून दहिवडी बाजूस येत असताना कुबेरवस्ती जवळ वळणावर चालकाचे  टॅ्रक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरमध्ये बसलेला संकेत मोहन जाधव खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद मोहन खशाबा जाधव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली. ट्रॅक्टर चालक नवनाथ उर्फ पप्पू आनंदराव खताळ याने खराब रस्ता असताना परिस्थितीचा विचार न करता भरधाव वेगाने व अविचाराने ट्रॅक्टर चालवल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संजय खाडे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: