Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रॉबर्ट वड्रांची दुसर्‍या दिवशी 10 तास चौकशी
ऐक्य समूह
Friday, February 08, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची गुरूवारी सलग दुसर्‍या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 10 तास कसून चौकशी केली.
रॉबर्ट वड्रा  यांना आज सकाळी साडेदहा वाजता ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, ते 11 वाजून 25 मिनिटांनी पोहोचले. त्यानंतर तब्बल दहा तास ते ईडी कार्यालयात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. या दरम्यान वड्रा  यांची कसून चौकशी करण्यात आली. आता शनिवारी वड्रा  यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रॉबर्ट वड्रा बुधवारीसर्वप्रथम दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले होते. काल त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, लंडनच्या 12, ब्रायनस्टोन स्क्वेअर येथील 19 लाख पौंड मूल्याची मालमत्ता वड्रा यांचीच असल्याचा तसेच लंडनमधील इतरही मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचा ‘ईडी’ चा आरोप आहे. या खरेदी व्यवहारात मनी लाँड्रिंगबाबतच्या कायद्यांचा भंग झाल्याचाही ‘ईडी’ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने या प्रकरणी वड्रा  यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: