Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सणबूर येथे शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, February 08, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re1
5सणबूर, दि. 7 : येथील दीक्षा आनंदा परीट (वय 23) हिने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, दि. 7 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीक्षा परीट ही ढेबेवाडी (मंद्रुळकोळे) येथील जयसिंगराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी घरी काम आहे, असे सांगून त्यांनी रजा टाकली होती. दुपारी त्या घरीच होत्या. 1 च्या सुमारास बाजूच्या घरात ओढ्याला कपडे धुवायला जाते म्हणून सांगितले. बराच वेळ झाला तरी त्या परत आल्या नाहीत म्हणून सर्वांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना दुपारी 4.15 च्या सुमारास राहत्या घराच्या माळ्यावर दोरीने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. धुवायला घेतलेली कपड्यांची घमेली,  पाटी तिथेच पडली होती. या घटनेची खबर ढेबेवाडी पोलिसांत दिली असता पंचनामा करून मृतदेह कराड येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास सपोनि. उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस करत आहेत.
सर्वांच्या डोळ्यात अश्रू 
या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या विद्यालयातील सर्व शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा झाले. आपल्या आवडत्या शिक्षिकेसाठी सर्वांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: