Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गांजा प्रकरणी दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : संभाजीनगर, ता. सातारा येथे गुरुवारी पकडण्यात आलेल्या गांजा प्रकरणी लक्ष्मण अंकुश जाधव (वय 32), शंकर विलास जाधव (वय 36), दोघेही रा. पळशी, ता. खटाव यांना येथील जिल्हा न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची सोमवार दि. 11 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, महामार्गावरून अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा उपविभागीय पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी सापळा रचला. सातारकडे येणारे सेंट्रो कार व दुचाकी ही दोन्ही वाहने एका मागोमाग येत असल्याने पोलिसांना या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी ती वाहने थांबवली. पोलिसांना पाहताच दोन्ही वाहन चालक गडबडले व वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. कारची पाहणी केली असता त्यामध्ये छोटी छोटी गाठोडी होती. याबाबत संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी गाठोडे खोलून पाहिल्यास त्यामध्ये गांजा सदृश पदार्थ आढळला. सुमारे 86 किलो वजनाचा गांजा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्व मुद्देमालाची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी कार, दुचाकी व गांजा जप्त करत शंकर जाधव व लक्ष्मण जाधव या दोघांना अटक केली होती. आज त्यांना येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दि. 11 फेब्रुवारीपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: