Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलन, दहा पोलीस बर्फाखाली अडकले
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: mn3
5जम्मू, दि. 8 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण हिमस्खलनात 10 पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात झालेल्या हिमस्खलनानंतर 10 पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर लष्कर आणि एनडीआरएफचे पथकही सहभागी झाले आहे.
कुलगाम जिल्ह्यातील जवाहर बोगद्याजवळ गुरूवारी सायंकाळी पोलीस कर्मचारी हिमस्खलनात अडकले गेले. यावेळी अनेक पोलीस कर्मचारी सुरक्षित बाहेर पडले. पण 10 जण बर्फाखाली दबले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: