Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधान मोदींनी वायुदलाचे 30 हजार कोटी लुटले
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: na3
‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी
मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुदलाचे 30 हजार कोटी रुपये लुटले आणि उद्योगपती अनिल अंबानी यांना दिले, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
मोदींनी अनिल अंबानी यांना दिलेल्या पैशाचा मुद्दा आम्ही गेल्या वर्षभरापासून उपस्थित करत आहोत. 
आता त्या संदर्भात अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे. त्यात मोदी हे राफेल कराराबाबत फ्रान्स सरकारशी प्रत्यक्षपणे सौदेबाजी करत आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितल्याचेही त्यांनी म्हटले.
मोदी सरकारने राफेल कराराबद्दल सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती सादर केली. याबाबत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे, तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या देखील खोटं बोलल्या. अनिल अंबानी यांना या करारात समाविष्ट करण्यासाठी मोदी यांनीच मध्यस्थी केली आणि अनिल अंबानी यांना या करारात समाविष्ट करून घेण्यासाठी दबाव टाकला, असे फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी कबूल केले असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: