Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जेडीएस आमदाराला 35 कोटींची ऑफर
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: na2
5कर्नाटक, दि. 10 (वृत्तसंस्था) : भाजपने आपल्याला सरकारमधून बाहेर पडण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप जेडीएसचे आमदार श्रीनिवास गोवडा यांनी केला आहे.
कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांनी आपल्याला 35 कोटींची ऑफर दिल्याचा दावा जेडीएसच्या एका आमदाराने केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड भेदची नीती अवलंबल्याचे चित्र आहे.
जेडीएसचे आमदार के. श्रीनिवास गोवडा यांनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, भाजपचे नेते सी. एन. अश्‍वथनारायण, एस. आर. विश्‍वनाथ आणि सी. पी. योगेश्‍वरा हे माझ्या कार्यालयात आले होते. भेटीदरम्यान त्यांनी मला जेडीएसमधून बाहेर पडून भाजपत येण्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर दिली. या सौद्यासाठी आगाऊ 5 कोटींची रक्कमही त्यांनी मला देऊ केली.    
मात्र, मी पक्षाशी प्रामाणिक असून गद्दारी कधीही करणार नाही, असे त्यांना सुनावले. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या कानावर ही बाब घातली असून भाजपच्या आमदारांना पैसे पुन्हा घेण्यास सांगितल्याचे गोवडा यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: