Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मतदानाच्या दोन दिवस आधी प्रिंट, सोशल मीडियावर प्रचारास बंदीची मागणी
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:33 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी घालण्यत यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला केली असल्याची माहिती आहे. निवडणुकीत मतदानाच्या 48 तासांपूर्वी उमेदवारांना प्रचारास बंदी असते. त्याचप्रकारे याद्वारेही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात सेक्शन 126 नुसार 48 तासांपूर्वी जाहीर सभा, रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यास मनाई असते. मात्र उमेदवाराकडून प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर जाहिराती देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. शिवाय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही पत्रात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रावर विधी मंत्रालयाने अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे कळतंय. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. आगामी दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशात निवडणूक आयोगाच्या सल्ल्यावर तत्काळ  अंमलबजावणी शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
पुढील आठवड्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सूचनेची दखल घेणे अद्यापतरी शक्य नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: