Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जुगार प्रकरणातील सहा जणांना जामीन सातार्‍यात संशयकल्लोळ, माहिती देण्यास टाळाटाळ
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि.11 : येथील एका नामांकित हॉटेलमध्ये रविवारी पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणार्‍या सहा जणांना अटक केली होती. त्यांना आज येथील न्यायालयापुढे उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सातारा शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी संबंधित हॉटेलवर पोलिसांचे एक पथक पाठवले असता त्या ठिकाणी अमोल चंद्रकांत पोकळे, रा. गुरुवार पेठ, शांतीलाल ओसवाल, रा. गोडोली सातारा, नीलेश कदम, रा. शुक्रवार पेठ, सातारा, नीलेश गायकवाड रा. न्यू विकास नगर, खेड,
गोपाळ, रा. आयटीआय रोड, शाहूपुरी सातारा हे सहा जण जुगार खेळताना आढळले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 83 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, काही मोबाईल आणि जुगाराचे साहित्य आदींचा समावेश आहे. या घटनेमुळे सातार्‍यात एकच खळबळ उडाली होती. या कारवाईबाबत गुप्तता पाळली जात होती. यातील आरोपींची नावे प्रसिद्ध होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर खटाटोप चालला होता. पोलिसांकडूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे जुगार कारवाईबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: