Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चाफळ ग्रामपंचायतीत सात लाखांची अफरातफर
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: re4
5चाफळ, दि. 11 : राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) ग्रामपंचायतीत सात लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे जिल्हा परिषद लेखा परीक्षणात उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी पाटणच्या गटविकास अधिकार्‍यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, चाफळ ग्रामपंचायतीमध्ये 2016-17 या आर्थिक वर्षात ग्रामनिधीत सात लाख सात हजार 110 रुपयांची अफरातफर केल्याची बाब जिल्हा परिषद लेखा परीक्षणात उघडकीस आल्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. 
ग्रामपंचायतीवर प्रथमदर्शनी अफरातफर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पाटणच्या गटविकास अधिकारी गायकवाड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून चाफळची ओळख आहे. मध्यंतरीची पंचवार्षिक वगळता ग्रामपंचायत स्थापनेपासून येथे आ. शंभूराज देसाई गटाची सत्ता आहे. अलीकडच्या काळात अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रामपंचायतीत सात लाख रुपयांची अफरातफर झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: