Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस
ऐक्य समूह
Friday, April 05, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 4 : विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडवा या नववर्षदिनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. 6 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्रीमंत रामराजे लक्ष्मी विलास पॅलेस, लक्ष्मीनगर, फलटण येथे  शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस नेहमीच फलटण शहर व तालुकाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याला नवी झळाळी देणारा, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात असलेला सुसंवाद अधिक दृढ करणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा असल्याने जिल्ह्यातून अनेक मंडळी वाढदिवसाचे औचित्य साधून एकत्र येतात. या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही वैचारिक मेळावा फलटणकरांना अनुभवता येणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त फलटण शहरात सुरू होणार्‍या नवीन उद्योग, व्यवसायांचा शुभारंभ श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते होणार आहे.  
त्यामध्ये शंकर मार्केट येथील लाइफ केअर फार्मसी या विश्‍वराज गांधी यांच्या औषध दुकानाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता, फलटण शहरातील प्रख्यात व्यापारी शांतिलाल खुशालचंद गांधी (सराफ) यांच्या शांतीकाका सराफ अँड सन्स या सोने-चांदी दागिन्यांच्या शोरुमचे उद्घाटन दुपारी 4 वाजता श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता श्रीराम ट्रेडर्स या ट्रॅक्टर शोरुमचा वर्धापनदिन श्रीमंत रामराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 6 वाजता श्रीराम वडे व स्नॅक बारचे उद्घाटन, त्यानंतर म. फुले चौकात नव्याने सुरू होत असलेल्या मॉन्जिनीज या केक शॉपीचे उद्घाटन सायंकाळी 6 वाजता श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: