Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओंडोशी येथे अज्ञात रोगाने मेंढ्यांचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, April 08, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: re2
5उंडाळे, दि. 7 : ओंडोशी, ता. कराड येथे अज्ञात रोगाने सुमारे 60 मेंढ्या मरण पावल्या असून सुमारे शंभरपेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाली असून या रोगाने लाखोचे नुकसान  झाले आहे.
कराड दक्षिण विभागाच्या डोंगरी भागात शेळी, मेंढी पालन हा काही विभागात अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे.  ओंड  नजीक असलेल्या ओंडोशी येथे मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढी पालन असून या डोंगराळ परिसरात ते शेळ्या-मेंढ्या पालन करुन  उदरनिर्वाह करतात.
गेल्या आठ दिवसांपासून  ओंडोशी गावात अज्ञात शेतात  फिरणार्‍या मेंढ्या अचानक मृत्यू पडू लागल्या आहेत.  ही  संख्या दररोज वाढू लागली असून  दररोज एका - एका कळपातील किमान पाच ते सहा मेंढ्या या रोगाने मृत्यू पडत  आहेत. याशिवाय मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी पाहणी करून मेंढ्यांवर उपचार केले, पण या रोगाचे निदान सापडले नाही. त्यामुळे नेमका रोग कोणता हे समजू न शकल्याने शेळ्या-मेंढ्या मरून पडण्याचे प्रमाण वाढत आहे.   यामध्ये  आनंदा यशवंत फसले यांच्या मालकीच्या  पंधरा  मेंढ्या मृत्यू पडल्या तर सुमारे 20 मेंढ्या  आजारी आहेत. याशिवाय तानाजी महादेव चोरमाले यांच्या बारा मेंढ्या मयत तर  13 आजारी आहेत. गोरख यशवंत भोसले यांच्या 17 मेंढ्या मरण पावल्या तर 20 पेक्षा अधिक मेंढ्या आजारी आहेत.   
शामराव यशवंत फसाले यांच्या 13 मेंढ्या मरण पावल्या असून 30 पेक्षा अधिक मेंढ्या आजारी आहेत.
 गेल्या आठ दिवसांपासून या रोगाची लागण होऊन वैद्यकीय विभागाला या रोगाचे नेमके कारण सापडले नाही. याबाबतचा ह्विसेरा करून तपासणीसाठी पाठवला आहे, पण त्याचा रिपोर्ट आला नसल्याने नेमके कारण काय हे समजू शकले नाही. सदर रोगाबाबत  तातडीने  कारण दिले असते  तर मेंढ्यांवर  उपचार झाले असते
व मेंढ्या वाचल्या असत्या दरम्यान वरिष्ठ वैद्यकीय विभागाने
याबाबत तातडीने पावले उचलून सदर रोगाचे निदान करून शेळ्या-मेंढ्या वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थ तसेच
धनगर समाजातून होत आहे. शिवाय मयत झालेल्या शेळ्या-मेंढ्या मालकांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांतून
होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: