Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मटका धंदा सुरू ठेवण्यासाठी दरमहा 30 हजाराची मागणी
ऐक्य समूह
Thursday, April 11, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: lo1
4 हजार 500 रुपयांची जबरी चोरी
5सातारा, दि. 10 : सातारा येथे मटका धंदा सुरू होण्यासाठी दरमहा 30 हजार रुपयांची मागणी धुडकावून लावल्याने सुनील कोळेकर यासह अन्य एकाने खिशातील 4 हजार 500 रुपये काढून घेतल्या प्रकरणी जबरी चोरीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 8 एप्रिल रोजी 8 वाजता सुनील कोळेकर, रा. रविवार पेठ, सातारा व त्याचा सहकारी यांनी जब्बार जमाल पठाण यांच्यासाठी मटका घेत असताना जैनुद्दीन जमाल पठाण (वय 50), रा. मेढा, ता.जावली याला इनोवा कारमध्ये बसवून जब्बार पठाण यांना फोन लावण्यास सांगितला. फोन न लागल्याने गाडीतील चाकूचा धाक दाखवून जैनुद्दीन जमाल पठाण याला मटका धंदा सुरू ठेवण्यासाठी दरमहा 30 हजार रुपयांची मागणी केली. मागणीस नकार दिल्याने जैनुद्दीन याच्या खिशातील 4 जार 500 रुपये काढून घेतल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: