Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात 5 लाखांची रोकड जप्त
ऐक्य समूह
Thursday, April 11, 2019 AT 11:40 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यात करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये 5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त असून या रोकडेची खातरजमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये महामार्गासह काही पॉइंट फिक्स करण्यात आले आहेत. त्याठिकाणी गेल्या 15 दिवसापासून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कराड तालुक्यात सलग दोन दिवस तपासणीमध्ये रोकड आढळून आली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा पोलीस दल सजग झाले होते. येथील विसावा नाका, अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप, वाढे फाटा आणि जरंडेश्‍वर नाक्यावर वाहनांसाठी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. आज सायंकाळी 7 वाजल्यानंतर एक संशयित बोलेरो जीप दिसून आल्याने तिची तपासणी केली असता त्यामध्ये 5 लाख रुपयांची रोकड आढळून आले. या जीपमधून तीन संशयित प्रवास करत होते. ही रक्कम सातारा शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून या रकमेबाबत संशयितांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: