Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोगदा परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 11 : दोन दिवसांपूर्वी बोगदा येथील तपासणी नाक्यावर विनापरवाना 2 ब्रास वाळू वाहतूक करणारा टेम्पो गस्ती पथकाने पकडला. दरम्यान महसूल विभागाने टेम्पो मालकाला 2 लाख 71 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती महसूल विभागातील अधिकार्‍यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री टेम्पो क्रमांक (एम. एच. 11 सीएच 3694) हा हौदा पॅक बंद केलेल्या अवस्थेत बोगदा परिसरात आला असता त्या ठिकाणी तपासणी नाक्यावर तैनात असणार्‍या पोलिसांना टेम्पोबाबत संशय आल्याने टेम्पो अडवला. चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. टेम्पोची तपासणी केली असता त्यामधून विनापरवाना वाळू वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर घातल्यानंतर टेम्पो पुढील कारवाईसाठी महसूल विभागाच्या ताब्यात देण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो तहसील कार्यालयात आणून लावला. याबाबत महसूल विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित टेम्पो हा पाटखळ, ता. सातारा येथील असून महेश यदू खंडझोडे असे मालकाचे नाव आहे. त्यांना 2 ब्रास विनापरवाना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी 2 लाख 71 हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा आदेश उद्या शुक्रवारी देण्यात येणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: