Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोटेवाडी येथे कर्जाला कंटाळून एकाची आत्महत्या
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: re2
5म्हसवड, दि. 15 : मोटेवाडी, ता. माण येथील मोहन उत्तम मोटे या शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वरकुटे-म्हसवड अंतर्गत मोटेवाडी येथील शेतकरी मोहन उत्तम मोटे (वय 50) या शेतकर्‍याने राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकरी हा अल्पभूधारक असून विकास सेवा सोसायटी तसेच बँकांचे कर्ज असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.  कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्‍चात दोन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा आहे. घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: