Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेन्सेक्सने केले 10 वर्षांतील रेकॉर्ड पार
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर सेन्सेक्समध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने सोमवारी 10 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आज 1421 अंकांच्या तेजीने बंद झाला तर निफ्टीतही 421 अंकांची वाढ नोंदवली गेली आहे. इडए आणि छडए मध्ये जास्त करून शेअर्समध्ये तेजी नोंदवली गेली आहे. आज दिल्ली बिल्डकॉन आणि लक्ष्मी विलास बँकांच्या शेअर्सनेही उसळी घेतली. 
अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
एसबीआय, इंडसइंड बँकेचे शेअर्स 8.5 टक्क्यांच्या तेजीने बंद झाले आहेत  तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 7 टक्के तेजी दाखवण्यात आली आहे. इन्फोसिस आणि बजाज ऑटोशिवाय सेन्सेक्समध्ये 30 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि  कोटक महिंद्रा बँकांचे शेअर्सही रेकॉर्ड ब्रेक करत उच्चांकावर पोहोचले आहेत. पीएसयू बँक इंडेक्स 7.9 टक्के राहिला आहे तर मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
रिटेल रिसर्टचे प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले, की ‘लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलने जास्त करून भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही असा अंदाज दिसत होता. जर भाजपने स्वबळावर बहुमत मिळविले तर शेअर बाजारात आणखी उसळी येईल.’ दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना माहीत आहे, की बर्‍याचदा एक्झिट पोल चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे शेअर बाजार एक मजबूत सरकार पाहते. मात्र, निकाल लागेपर्यंत म्हणजेच 23 मेपर्यंत लोकांनी वाट पाहिली पाहिजे, असेही दीपक जसानी म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: