Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाणी प्रश्‍नाचे राजकारण करणार्‍यांना कसल्या भगीरथाच्या उपमा देता? आ. जयकुमार गोरे
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्‍नांचे राजकारण करणार्‍यांना कसल्या भगीरथाच्या उपमा देता, त्यांना तसे संबोधणे म्हणजे भगीरथ नावाचा अपमान करण्यासारखे आहे असा टोला माणचे आ. जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना लगावला.
येथील शास-कीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते. जिल्ह्याच्या हक्काचे पाणी बाहेर नेल्यास खबरदार होणार्‍या परिणामांना भोगा-यला आम्ही तयार आहोत असा इशारा गोरे यांनी दिला. टेंभूचे पाणी खटावला मिळाल्याशिवाय पुढे जाणार नाही. पाण्याचे वाटप बाहेर सुरू असताना जिल्ह्याचे नेते का गप्प होते असा सवालही गोरे यांनी थेटपणे विचारला. जिल्ह्याच्या बाहेर टेंभू व ताकारी-म्हैसाळ प्रकल्पाला मिळणारे कोयनेचे पाणी व आरफळ योजनेचे चार टीएमसी असे 52 टीएमसी पाणी   सातारा जिल्ह्याला तहानलेले ठेऊन बाहेर जाते. या परिस्थितीला शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर जबाबदार आहेत. आता आमच्या लढाईचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे शरद पवार दुष्काळी माण व खटावचा दौरा करतात. टेंभूचे पाणी कराड व खटाव तालुक्यातील 36 गावांना मिळायला हवे. स्व. यशवंतराव चव्हाणांचे वारसदार जनतेच्या हिताची भूमिका घेत नाहीत. दुष्काळी जनतेला फसवणार्‍या पवारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला. रोहित पवारांच्या वाढत्या दुष्काळी दौर्‍याबाबत गोरे यांना छेडले असता ते म्हणाले, लोकशाहीत उमेदवाराला मतदारसंघाचे स्वातंत्र्य आहे पण एकतफी लढाईपेक्षा रंगतदार लढाईत मजा येईल. गोरेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, आम्ही अजून तसा विचार केला नाही. नीरा देवघरच्या प्रश्‍नात मी प्रचंड व्यस्त होतो. जयकुमार गोरे म्हणाले, पक्ष कोणताही असो आमची मैत्री अबाधित आहे. आमचं जे ठरलंय ते पहिल्या दिवसापासून. काही दिवसांनी अजून काही तरी बघायला मिळेल असे पण ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: