Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडजल येथे अपघातात महिला ठार; दोघे जखमी
ऐक्य समूह
Monday, June 17, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 16 : वडजल, ता. फलटण गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार व एक लहान मुलगी जखमी झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुशांत अण्णा मोहिते (वय 21, रा. नागेश्‍वरनगर, जिंती, ता. फलटण) हे आपल्या बजाज प्लॅटिनावरुन (नंबर नसलेली नवीन गाडी) थोरली बहीण शिल्पा प्रवीण भोसले (वय 21) आणि तिची मुलगी कु. सुवर्णा प्रवीण भोसले (वय 8, दोघी रा. पिंगोरी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे तिघे जण  नांदल, ता. फलटण येथील नवीन घराची वास्तुशांत असल्याने जिंतीहून नांदलकडे निघाले असता दुपारी 3.30 च्या सुमारास वडजल गावच्या हद्दीत   हॉटेल चैतन्यसमोर पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने (क्र. एम. एच. 02 बीटी 7779) दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये सुशांत मोहिते यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागला. मुलगी कु. सुवर्णा प्रवीण भोसले ही किरकोळ जखमी झाली असून पाठीमागे बसलेल्या शिल्पा प्रवीण भोसले यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर इनोव्हा कारचालक तसाच निघून गेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागटिळक तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: