Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिजवडी येथे ट्रक-कारच्या धडकेत दोन गंभीर
ऐक्य समूह
Monday, June 17, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: re2
5बिजवडी, दि. 16 :  येथील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ झालेल्या ट्रक-कारच्या भीषण अपघातात कार चालकासह दोघे गंभीर जखमी झाले असून महिला शिक्षिकेसह इतर जखमी झाले आहेत. त्यांना फलटण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटणहून दहिवडीकडे ट्रक (क्र. एम.एच.12 एफसी 7151) निघाला होता. तर दहिवडीवरून फलटणकडे जाणारी इर्टिगा कार (क्र.एम. एच. 12 एलजे 5388) ओव्हरटेक करत असताना समोरून येणार्‍या ट्रकवर जावून आदळल्याने कारच्या व ट्रकच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. या धडकेत कारमधील चालक निंबाळकर व त्यांच्या शेजारी बसलेल्यांना (नावे समजू शकले नाहीत) जोरदार मार लागला असून पाठीमागे बसलेल्या महिला शिक्षिका शालन मोरे व इतरही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी व काही लोकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ 108 ला फोन करून गाडी बोलावली व अपघातातील जखमींना फलटणला उपचारासाठी पाठवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केलेे.  
सदर घटनेचा पंचनामा दहिवडी पोलीस स्टेशनने केला असून सपोनि. प्रमोद दीक्षित तपास करत आहेत. दरम्यान, माण तालुक्यातील राणंद जिल्हा परिषद केंद्रात कार्यरत असणार्‍या शालन प्रदीपकुमार मोरे यांची बदली झाल्याने बदलीची ऑर्डर घेण्यासाठी त्या राणंद येथे गेल्या होत्या, अशी माहिती मिळत आहे. ऑर्डर घेऊन फलटणकडे जाताना बिजवडी नजीक अपघात झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: