Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाईंच्या 63 व्या वाढदिनी 63 झाडांचे वृक्षारोपण
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: re2
5परळी, दि. 18 : ‘वृक्षवल्ली सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात स्वतःच्या गावावर आणि गावातल्या माणसांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाई वांगडे. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील नित्रळ या गावचे भाई. त्यांच्या वाढदिवस प्रथमच नित्रळ येथे साजरा करण्यात आला. गावातील तरुणांनी त्यांच्या 63 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावच्या परिसरात 63 झाडे लावली. अन् त्या झाडांचे संवर्धन करण्याची शपथही घेतली.
त्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक किसन बाबूराव वांगडे आणि कृष्णा धोंडिबा वांगडे यांच्या हस्ते केला. त्यांना सप्रेम भेट म्हणून 63 लाँग नोट बुक ज्या भाई परळी भागातील शालेय विद्यार्थ्यांना भेट म्हणून देणार आहेत आणि तरुणाई त्यांना गुरुस्थानी मानत असल्याने श्री गुरुचरित्र ग्रंथ त्याच दिवशी वाढदिवस असणार्‍या आस्था वांगडे व मातृतुल्य तानुबाई मारुती वांगडे आणि यांच्या हस्ते एकत्र वाढदिवस साजरा करून त्यांना देण्यात आला व त्यामुळे या अनोख्या उपक्रमाने गावाला गावपण आणणारे भाई वांगडे यांचा वाढदिवसाचा सोहळा आगळावेगळा असा पार पडला. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील परळी खोर्‍यातील नित्रळ येथे श्री केदारनाथ गृहनिर्माण सहकारी निर्माण संस्था, श्री. केदारनाथ ग्रामीण विकास संस्था, श्री शुक्राचार्य सेवा मित्र मंडळ व स्व. रावसाहेब वांगडे मास्तर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्‍वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांच्या 63 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत नित्रळ येथील ग्रामस्थांनी 63 झाडे लावून ती झाडे जगवण्याचा निर्धार केला. भाई वांगडे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व गावाच्या मातीत जन्माला आले. हेच गावचे भाग्य. ‘बोले तैसा चाले’ त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात जीवन जगणारे भाई वांगडे. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम रावसाहेब भाऊसाहेब वांगडे (मास्तर) यांच्या पुतळ्यात अभिवादन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब वांगडे यांनी केले आणि कार्यक्रमाची प्रस्थावना श्री केदारनाथ ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष किरण वांगडे यांनी केली.
जिल्ह्यात व राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळामुळे माणसांचे बेहाल होत आहेत. दुष्काळाला कारण म्हणजे झाड नसणे हा आहे. आपल्या आजूबाजूला आपण जी झाडे पाहतो. त्या झाडांमध्ये नवीन अशी भर पडत नाही.उलट आहे तीच झाडे कमी होत आहेत. झाडांच्या घटत्या संख्येमुळे भविष्यात भयावह परिस्थिती निर्माण होईल. त्यापूर्वी आपल्या परिसरात झाडे लावून ती झाडे वाढवली पाहिजेत.  हेच ओळखून नित्रळाच्या तरुणांनी नवा आदर्श ठेवला आहे, असे भाई वांगडे यांनी सांगितले.
माझ्या जन्मगावी आजचा वाढदिवस साजरा होतो आहे,खरंच मी खूप भाग्यवान आहे.त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला हजर राहताना व शुभेच्छा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी पुष्पगुच्छा ऐवजी वही पेन आणावेत. जेणेकरुन या साहित्याचा वापर शिकणार्‍या गरजू विद्यार्थ्यास निचिश्‍चत होईल, असे दस्तुरखुद्द भाई वांगडे यांनी आवाहन केले होते. कार्यक्रमाच्या अंती भाईंच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्याला गावचे उपसरपंच सखाराम वांगडे, रघुनाथ वांगडे, सखाराम वांगडे, किसन वांगडे, भीवराम वांगडे आदी स्थानिक ग्रामस्थांबरोबर मुंबई मंडळांनी हजेरी लावली. यावेळी शिवसह्याद्री सहकारी पतपेढीचे महाव्यवस्थापक प्रताप वांगडे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्‍वासराव वांगडे,केदारनाथ ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष किरण वांगडे, सातारा सहकारी बँकेचे कर्मचारी दशरथ वांगडे, शुक्राचार्य सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन वांगडे सचिव नीलेश वांगडे, अभिजित वांगडे, युवराज वांगडे, नितेश वांगडे, रविकांत वांगडे, केदार वांगडे, संतोष वांगडे, गुरुनाथ पवार, श्रीनिवास वांगडे, अमर वांगडे, ज्ञानेश्‍वर वांगडे, प्रल्हाद वांगडे, भालचंद्र वांगडे आदी कार्यकर्त्यांनी हजेरी लावून या सोहळ्याला सहकार्य केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: