Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आजपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re4
विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या जागा वाढवल्या
5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. विज्ञान शाखेसाठी 5 टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी 8 टक्के जागा वाढल्या आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  विज्ञान शाखेसाठी 5 टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी 8 टक्के जागा वाढवल्या असल्याची घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
विनोद तावडे यांच्याकडे असलेले शिक्षण खाते  आशिष शेलार यांना रविवारीच देण्यात आले. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पहिलाच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतला आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी जागा कमी पडल्याची तक्रार कायमच महाविद्यालयांकडून केली जाते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता आशिष शेलार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीचा अकरावीच्या प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवता येईल का? याची चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाईल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच हा निर्णय घेतला गेला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: