Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुका पवनचक्की रस्ता प्रकरण
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: RE1
शेखर गोरे यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता
5वडूज, दि. 18 : खोपडे( ता. माण) येथील विंड मिल या पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी जबरदस्ती करून धमकावणे व शिवीगाळ करून जमिनीतून रस्ता काढल्याप्रकरणी शेखर गोरे व अन्य दोघांना 3 वर्षे शिक्षा व दंड, अशी शिक्षा दहिवडी न्यायालयाने सुनावली होती. शिक्षेच्या विरोधात वडूज सत्र न्यायालयात शेखर गोरे यांनी अपील केले होते. त्याचा निकाल मंगळवारी लागला असून वडूज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखर गोरेसह दोघांची निर्दोष मुक्तता केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील शेखर गोरे व अन्य दोघांवर खोपडे  येथील पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी कस्तुराबाई अंकुश घाडगे यांच्या जमिनीतून जबरदस्तीने, दमदाटी व शिवीगाळ करून रस्ता केल्याप्रकरणी 2013 रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. दहिवडी न्यायालयात शेखर गोरे सह अन्य दोघांना 3 वर्षे शिक्षा व 11 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात अपील करण्यासाठी त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. या शिक्षेच्या विरोधात वडूज सत्र न्यायालयात दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी अपील दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी होऊन दि. 18 रोजी न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखर गोरे, अंकुश गोरे व बापूराव जगदाळे यांची निर्दोष मुक्तता केली. या कामी अ‍ॅड. नितीन गोडसे, अ‍ॅड. नितीन शिंगाडे व अ‍ॅड. राहुल काळे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून शेखर गोरेसह तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: